बेस्ट’ प्रवाशांच्या सेवेत चलो स्मार्ट कार्ड !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बेस्ट’ प्रवाशांच्या सेवेत आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून ‘चलो मोबाईल ऍप’ या स्मार्ट कार्डची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाबाहेरील ‘बेस्ट’ बस आगारात स्मार्ट कार्ड वितरण सुरू करण्यात आले. या कार्डच्या आधारे पास, तिकीटही काढता येणार आहे. या कार्डमध्ये दहा रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत रक्कम रिचार्ज करता येणार आहे. हे कार्ड ‘बेस्ट’ डेपो आणि कंडक्टरकडे उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे कार्ड 70 रुपयांचे असून त्यामध्ये प्रवाशांना हवे तसे प्लॅन ऍक्टिक्ह करता येणार आहेत. ‘चलो मोबाइल ऍप’मुळे प्रवाशांना नेमकी बस किती वाजता येणार आहे, हे समजणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच स्मार्ट कार्डमुळे सुट्या पैशांची समस्या सुटणार असून प्रवाशांना 72 प्लॅनचा वापर करून प्रवास करता येणार आहे. या कार्डचे पर्यावरणमंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झाले.