
नव वर्षानिमित्त शिवसेना, युवा सेनेसह विविध सामाजिक संघटना, संस्थांकडून नव्या कोऱ्या आकर्षक दिनदर्शिकांचे प्रकाशन केले जात आहे. सर्वसामान्यांना आपले वार्षिक नियोजन करण्याबरोबरच सण, समारंभ, मुहूर्त, राशीभविष्य पाहण्यासाठी या दिनदर्शिका उपयुक्त पडत आहेत.
शिवसेना शाखा क्रमांक 206 च्या ‘दिनदर्शिका 2022’ चे प्रकाशन राज्याचे पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना नगरसेकक सचिन देवदास पडवळ, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे आदी उपस्थित होते.
ए, बी आणि ई प्रभाग समितीचे अध्यक्ष रमाकांत रहाटे यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षानिमित्त प्रभाग क्र. 207 व 208 करिता ‘कालनिर्णय दिनदर्शिका-2022’ तयार केली असून त्याचे प्रकाशन शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, विधानसभा समन्वयक बबन गावकर, उपविभागप्रमुख विजय कामतेकर, उपविभागप्रमुख राम सावंत, शाखाप्रमुख हेमंत कदम, रमेश रावल, शाखा संघटक संगीता मारणे, शाखा समन्वयक अनुराधा परब, युवासेनेचे चेतन थोरात, अमित परब, सागर जाधव उपस्थित होते.
































































