बस नदीत कोसळून तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात आज (रविवार) सकाळी बस नदीत पडल्याने एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला, तर 28 जण जखमी झाले. पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, अलीराजपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर गुजरात सीमेला लागून असलेल्या चंद्रपूरमध्ये ही घटना घटली. त्यांनी सांगितले की, ही खासगी बस गुजरातमधील छोटा उदयपूर येथून अलीराजपूरकडे येत असताना मेळखोदरा नदीवरील पुलावरून बस खाली पडली. या अपघातात कैलास मेदा (48), त्यांची पत्नी मीराबाई (46) आणि एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या 28 जणांना अलीराजपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.