
कोरोना पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला असून मुंबई महापालिकेने शाळांसंदर्भात त्वरित निर्णय घेतला आहे. मुंबईत पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा बंद होणार आहे. फक्त 10 वी आणि 12 वीचे वर्ग यातून वगळण्यात आले आहेत. मात्र ऑनलाइन शाळा सुरू राहणार आहेत.
#BreakingNews : मुंबईत पुन्हा शाळा बंद, मात्र शिक्षण सुरू, 10 वी – 12 वीचे वर्ग वगळणार #Covid_19 #Covaxin #BMC #schoolclosed #mumbai #mumbaiupdates pic.twitter.com/QLgLVPPV1g
— Saamana (@SaamanaOnline) January 3, 2022
4 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 या दरम्यान शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात ऑनलाइन शाळा सुरू राहतील.
दरम्यान, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू करण्यात आले आहे. हे लसीकरण केंद्रांवर सुरू राहिल.






























































