कोस्टल रोडसाठी 500 कोटींचा विशेष निधी, पायाभूत सुविधा विकास निधीमधून रक्कम वळवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला वेगवान बनवणाऱ्या पालिकेच्या कोस्टल रोडचे निम्मे काम सध्या फत्ते झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. कोस्टल रोडच्या नियोजनबद्ध कामामुळे 2021-22 च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या 2000 कोटी रकमेतील 1996.935 इतकी रक्कम खर्च झाली आहे. त्यामुळे पॅकेज 1, 2 व 4चे कंत्राटदार, सल्लागार व साधारण सल्लागार यांच्या कामाचा मोबदला देण्यासाठी जानेवारी 2022 पर्यंत सुमारे 500 कोटी रुपये अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिदान करावे लागणार आहे. यासाठी पायाभूत सुविधा विकास निधीतून 500 कोटी रुपये वळते केले जाणार आहे.

मुंबईला वेगवान-सुरक्षित, प्रदूषणमुक्त प्रवास देणारा पालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचा 2 किमीचा महत्त्वपूर्ण टप्पाही पूर्ण झाला आहे. प्रिसेंस स्ट्रिट फ्लाय ओक्हर ते वरळी सी-लिंकपर्यंत 10.58  किमीच्या कोस्टल रोडचे काम सध्या केगाने सुरू आहे. या बांधकामात पॅकेज प्रियदर्शनी पार्क ते छोटा चौपाटीदरम्यान 2.070 किलोमीटरचा तीन लेनचा बोगदा दोन्ही बाजूंनी बांधण्यात येत आहे. पालिकेच्या माध्यमातून नियोजनबद्धरीत्या काम सुरू असल्यामुळे तरतूद केलेल्या निधीचा विनियोगही वेळेवर होत आहे. या कामात सल्लागार व साधारण सल्लागार यांचे अधिदान जानेवारी महिन्यात करायचे आहेत. यासाठी अतिरिक्त 500 कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा विकास निधीमधून 500 कोटी रुपये घ्यावे लागणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

असा जमा होतो पायाभूत सुविधा विकास निधी

पायाभूत सुविधा विकास निधी या विशेष निधीअंतर्गत जमा होणारी रक्कम मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांकरिता वापरली जाते. या पार्श्वभूमीवर कोस्टल रोड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड यांचा खर्च विशेष निधीमध्ये जमा होणाऱ्या रकमेमधून करण्यात येतो. फंजिबल चटई क्षेत्र निर्देशांकातून मिळणारे उत्पन्न या निधीत जमा केले जाते.पालिकेच्या 80 हजार कोटींच्या मुदत ठेकींमधून सुमारे 50 हजार कोटींचा निधी हा किकिध पायाभूत प्रकल्पांसाठी राखून ठेकण्यात आला आहे. त्यातील हा निधी भाग आहे.

असा होणार खर्च

या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च 12 हजार 721 कोटी रुपये असून आता पर्यंत तीन हजार कोटी रुपयांच्या कर खर्च करण्यात आला आहे. तर, या आर्थिक वर्षात 2 हजार कोटी रुपयांचा पूर्ण निधी वापरण्यात आला आहे.