वांद्रे येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक अनिल जाधव (52) यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अॅकेडमी व त्याअंतर्गत येणाऱया विविध कोर्सेसना अंतिम मंजुरी देण्याच्या मोबदल्यात जाधव यांनी लाचेची मागणी केली होती.
या प्रकरणातील तक्रारदार हे टेंडर स्किन इंटरनॅशनल अॅकॅडमीमध्ये भागीदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ येथे त्यांच्या अॅपॅडमी व त्याअंतर्गत येणाऱया विविध कोर्सेसच्या मंजुरीसाठी अर्ज जाधव यांच्या कार्यालयात केला होता. शिवाय त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली असून जुलै 2021 मध्ये त्यांना पूर्वमंजुरी मिळालेली आहे. असे असतानाही अंतिम मंजुरी देण्याकरिता जाधव यांनी पाच लाखांची मागणी केली. लाच द्यायची नसल्यामुळे अर्जदाराने अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज अनिल जाधव यांना पाच लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.



























































