
ग्लोबल क्रिप्टो सुपर अॅप्लिकेशन CryptoWire ने हिंदुस्थानातील पहिला क्रिप्टोकरन्सी इंडेक्स IC15 लाँच केला आहे. हा निर्देशांक जगातील सर्वाधिक व्यापार झालेल्या क्रिप्टोकरन्सीच्या कामगिरीचा मागोवा घेईल. CryptoWire हे TickerPlan चे विशेष बिझनेस युनिट आहे. याची लोकप्रियता दिवसागणित वाढताना दिसत असून मोठ्या संख्येने लोक यात गुंतवणूक करत आहेत.
हा निर्देशांक बाजारातील 80 टक्के हालचाल कॅप्चर करतो. हे एक मूलभूत मार्केट ट्रॅकिंग आणि मूल्यांकन साधन आहे. CryptoWire ची इंडेक्स गव्हर्नन्स कमिटीमध्ये डोमेन तज्ञ, उद्योग व्यवसायी यांचा समावेश असलेली असेल. IC15 मध्ये Bitcoin, Ethereum, XRP, Bitcoin Cash, Cardano, Litecoin, Binance Coin, Chainlink, Polkadot, Uniswap, Dogecoin, Solana, Terra, Avalanche आणि Shiba Inu यांचा समावेश असेल.
मुंबईस्थित कंपनी IC15 ची रचना क्रिप्टो मायनिंगची इन्साईट माहिती पुरवण्यासाठी करण्यात आली आहे. हे युजर्सला क्रिप्टो मार्केटचा योग्य बेंचमार्कची माहिती देखील पुरवणार आहे. या निर्देशांकासह गुंतवणूकदार आणि गुंतवणूक व्यवस्थापक क्रिप्टोकरन्सीच्या जागतिक बाजारातील कामगिरीचा मागोवा घेऊ शकतील. दरम्यान, हिंदुस्थानात क्रिप्टोकरन्सीचा ट्रेंड खूप वाढला आहे. अनेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोक यामध्ये गुंतवणूक करत आहेत. केंद्र सरकार याशी संबधिती विधेयक आणणार असले तरी या संसदेच्या अधिवेशनात क्रिप्टो विधेयक मांडण्यात आले नाही.


























































