Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा 10 जानेवारीचे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Monday, january 10, 2022)
तुमच्या देण्याच्या वृत्तीचा तुम्हाला फायदाच होईल. प्रिय व्यक्तिला समजून घ्या. घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. जोडीदारासोबत वेळ घालवाल. गरजू व्यक्तिला वेळीच मदत केल्याने तिचे नुकसान टळेल.
शुभरंग- हिरवा

वृषभ (TAURUS Monday, january 10, 2022)
घरी ताणतणावाचे वातावरण असले तरी विचारपूर्वक निर्णय घ्या. वस्त्राची आवश्यकता असलेल्या व्यक्तिला वस्त्र दान करा. कुटुंबासोबत दिवस घालवाल. आपल्या आवडत्या व्यक्तिसाठी वेळ काढाल.
शुभरंग- मोती

मिथुन (GEMINI – Monday, january 10, 2022)
आज तुम्हाला प्रोत्साहन मिळेल अशा घटना घडतील. मनात नकारात्मक विचार आणू नका. मित्रांना योग्य आणि आवश्यक सल्ला द्यावा लागेल. संध्याकाळी कुटुंबियांबरोबर आनंदात वेळ घालवाल.
शुभरंग- आकाशी

कर्क (CANCER – Monday, january 10, 2022)
मद्यपान आणि सिगारेट या व्यसनांपासून दूर राहा. लहान मुलींना खीर खाऊ घाला. जोडीदाराचे डोळे आज काहीतरी वेगळे सांगून जातील. आज तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. आलेल्या समस्येशी दोन हात कराल.
शुभरंग- जांभळा

सिंह (LEO – Monday, january 10, 2022)
प्रभावी व्यक्तिंचा पाठिंबा मिळाल्यामुळे मनोबल वाढायला मदत होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वृद्ध व्यक्तिंच्या पाया पडा. घरात कोणालाही दुखवू नका.
शुभरंग- मोती

कन्या (VIRGO – Monday, january 10, 2022)
भूतकाळातील घटनांचा विचार करू नका. नैराश्यामुळे प्रकृतीवर दुष्परिणाम होऊ शकतो. जोडीदाराबरोबर चित्रपट पाहायला जाल. जोडीदाराला खूश ठेवण्यात यशस्वी व्हाल. मित्रमैत्रिणींसोबत थट्टा करतांना आपल्या सीमा ओलांडू नका. उकडलेले चणे गरजू व्यक्तिंना दान करा.
शुभरंग- लाल

तूळ (LIBRA – Monday, january 10, 2022)
प्रकृती चांगली राहिल. आजारी व्यक्तिंना मदत करा. घरात समजुतीचे वातावरण राहिल. छोट्या छोट्या गोष्टिंतून आनंद घ्यायला शिकाल. कुटुंबियांसाठी वेळ काढाल.
शुभरंग- आकाशी

वृश्चिक ( SCORPIO – Monday, january 10, 2022)
तुमची चिंता, काळजी मिटवण्यासाठी आवश्यक काळ आहे. काही महत्त्वाचे निर्णय आज घ्यावे लागतील. व्यवसायात नवीन कल्पना आकार घेतील. परगावी प्रवास करावासा वाटेल. नवीन नातेसंबंध जुळण्याची शक्यता आहे.
शुभरंग- राखाडी

धनु (SAGITTARIUS – Monday, january 10, 2022)
इष्टदेवतेची पूजा करा. आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या, गहाळ होण्याची शक्यता आहे. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आवडत्या देवतेला लाल कुंकू आणि लाल फूल अर्पण करा. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभरंग- केशरी

मकर ( CAPRICORN – Monday, january 10, 2022)
आशावादी राहा. आज चांगल्यापैकी पैसे मिळण्याची शक्यता आहे. घरातील व्यक्तिंना समजून घ्यावे लागेल. खर्चात वाढ होत असेल तर बचतीकडे लक्ष द्या. भात, गूळ, दलिया, फळे, गहू आवश्यकतेप्रमाणे दान करा. फायदा होईल.
शुभरंग – चंदेरी

कुंभ (AQUARIUS – Monday, january 10, 2022)
आरोग्य चांगले राहील. दिव्यांग व्यक्तिंना मदत करा. आवडते संगीत ऐका मरगळ निघून जाईल. आवडत्या व्यक्तिंकडून मिळालेल्या एक कप चहामुळे शरीरातला ताजेपणा वाढेल. जोडीदारासोबत क्षुल्लक वाद घालण्याच्या फंदात पडू नका.
शुभरंग – पिवळा

मीन (PISCES – Monday, january 10, 2022)
पाहुण्यांचा सहवास मिळेला. त्यामुळे दिवस आनंददायी होईल. नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखावी लागेल. तुम्ही केलेल्या कामाची स्तुती होईल. जोडीदारासाठी रात्रीच्या जेवणात त्याच्या आवडीचा पदार्थ बनवा.
शुभरंग – जांभळा