पोलिसांचे कोव्हिड सेंटर पुन्हा ऍक्टिव्ह, दुसऱ्या डोस नंतर 57 जणांना लागण, 101 जण हॉस्पिटलमध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओमायक्रोनचा झपाटय़ाने फैलाव होत असताना पोलीस दलातही त्याची मोठय़ा प्रमाणात लागण होऊ लागली आहे. आजस्थितीत 643 पोलीस ऑक्टिव्ह रुग्ण असून 101 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. कोरोनाची लगण होण्याचे प्रमाण पाहता कलिना येथील पोलिसांचे कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

पोलीस अंमलदारांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोरोनाची लागण होऊ लागली आहे. सद्यस्थितीत 13 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लागण झाली आहे. तर 643 अधिकारी, कर्मचाऱ्यांनादेखील कोविड झाला आहे. मात्र सर्वांची प्रकृती ठीक असून बरं होणाचे प्रमाणदेखील चांगले आहे. 101 पोलीस हॉस्पिटलमध्ये दाखल असून हा आकडा खाली घसरला आहे. तर 450 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 57 जणांना दुसऱ्या डोसनंतर कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाली असली तरी अधिकारी, अंमलदारांची प्रकृत्ती ठीक असून चिंतेची बाब नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दुर्दैवाने दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.