
टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सर लवलीना हिने कास्यपदक जिंकून देशाचा तिरंगा फडकावला. या गुणी खेळाडूला बुधवारी आसाम पोलीसमध्ये पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदी नियुक्ती देऊन सन्मानित करण्यात आले. आगामी काळात लवलीना ही हिंदुस्थानी पोलीस सेवेत एक दिवस एपीएस व आयपीएस पदापर्यंत नक्की पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी व्यक्त केला. हा सन्मान मिळाल्याबद्दल भावनिक झालेल्या लवलीनाने पोलीस विभागाचे आभार मानले. आसाम सरकारकडून लवलीनाला मासिक वेतनाबरोबरच प्रशिक्षणासाठी दर महिन्याला एक लाख रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.






















































