काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला फसवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chandrakant-patil

‘कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपला सोबत घेत दोन्ही काँग्रेसनी आमची फसवणूक केली. फसवण्याची त्यांची परंपरा जुनीच आहे, पण हे पाप याच जन्मात फेडावे लागेल,’ असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर पाटील यांनी जोरदार टीका केली. ‘सहकारात भाजपची ताकद मर्यादित आहे. यामुळे त्यातल्या त्यात चांगला पर्याय म्हणून आम्ही दोन्ही काँग्रेससोबत गेलो. त्यामुळे अमल महाडिक बिनविरोध संचालक झाले. सहयोगी सदस्य असलेल्या जनसुराज्यला दोन जागा मिळाल्या. पण, आमदार प्रकाश आवाडे आणि अशोक चराटी यांना दोन्ही काँग्रेसने फसवले. या फसवणुकीमुळे भाजपचा दोन जागांवर पराभव झाला, ’ असा आरोप पाटील यांनी केला.