पोलीस कॉन्स्टेबल ‘मिस महाराष्ट्र’; बीडच्या प्रतिभा सांगळे यांचा प्रेरणादायी प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडमध्ये पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रतिभा सांगळे यांनी ‘मिस महाराष्ट्र’ हा किताब पटकावला आहे. कुस्तीपटू, पोलीस दल ते ‘मिस महाराष्ट्र’ असा त्यांचा प्रवास ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील आहेत. 2010 साली त्या बीडमध्ये पोलीस दलात रुजू झाल्या. सध्या त्या पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत.