महाराष्ट्रातील 13 हत्ती गुजरातच्या जामनगर मध्ये नेण्यास वाढता विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील 13 हत्ती गुजरातच्या जामनगर मध्ये नेण्यास विरोध केला जातोय. गडचिरोली जिल्ह्यातील दोन तर चंद्रपूरच्या ताडोबा प्रकल्पातील एकूण 13 हत्तींचा यात समावेश आहे. राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण व केंद्रीय वन व पर्यावरण बदल मंत्रालयाने हा प्रस्ताव दिला होता.

महाराष्ट्रातील 13 हत्ती गुजरातच्या जामनगर मध्ये नेण्यास विरोध होतो आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली आणि सिरोंचा या दोन तर चंद्रपूरच्या ताडोबा प्रकल्पातील एकूण 13 हत्तींचा यात समावेश आहे. राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण व केंद्रीय वन व पर्यावरण बदल मंत्रालयाने हा प्रस्ताव दिला होता. राज्य सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठीचे परिवहन नियोजन पूर्ण झाले असून तीन टप्प्यात हे 13 हत्ती जामनगरच्या एका खासगी  समूहाद्वारे संचालित 250 एकरातील प्राणिसंग्रहालयात पाठविले जाणार आहे. जामनगर येथील राधेकृष्ण मंदीर हत्ती कल्याण ट्रस्ट हत्ती परिवहनाचे काम दोन्ही राज्ये आणि केंद्रीय वनमंत्रालय तज्ज्ञांच्या देखरेखीत करणार आहे. या 13 हत्तींमध्ये ताडोबा प्रकल्प:– 4 नर 2 मादी, आलापल्ली वनविभाग:– 2 नर 1 मादी, सिरोंचा वनविभाग (कमलापूर कॅम्प) :– 1 नर 3 मादी यांचा समावेश आहे.वनविभागाची लाकूड वहनाची कामे करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून कमलापूर येथे हे हत्ती कॅम्प पर्यटन स्थळ विकसित करण्यात आले आहे.

जिल्हा व राज्यातून हजारो पर्यटक हत्तींचा मुक्तसंचार अनुभवण्यासाठी कमलापूर येथे येत असतात. कमलापूर येथे वनविभागाच्या अखत्यारीतील हत्तींना गुजरातेत पाठवण्यास विरोधाचे सूर उमटले आहेत. कमलापूरातील सुविधा वाढवून हा कॅम्प सुयोग्य पर्यटन स्थळ करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

गेली काही वर्षे ताडोबातील हत्ती बिथरण्याच्या घटना पुढे आल्या होत्या. त्यामुळे हत्ती सफारी थांबविण्यात आली. तर आलापल्ली येथेलाकूड वहनासाठी यंत्र आणि ट्रक्सचा वापर वाढल्याने या हत्तींवरील देखरेख खर्च मोठा मुद्दा झाला होता.