
मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या आता नियंत्रणात येत असून सलग तिसऱया दिवशी सहा हजारांच्या घरात राहिली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 6149 कोरोनाबाधित आढळले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत नवे रुग्ण आढळल्यामुळे आतापर्यंत बाधित रुग्णसंख्या 1,011,967 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 12,810 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या 9,48,744 झाली आहे. मुंबईत सद्यस्थितीत 44,084 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 16,476 कर पोहोचली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी 94 असून कोविड वाढीचा दर 1.10 टक्के आहे. तर दुपटीचा दर 61 दिवस आहे. आज मुंबईत 47,700 चाचण्या झाल्या आहेत तर आतापर्यंतच्या चाचण्या 1,47,17,804 एवढय़ा झाल्या आहेत.
राज्यात 38 हजार 824 कोरोना रुग्ण बरे
39 हजार 207 नवीन रुग्णराज्यात 39 हजार 207 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 38 हजार 824 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के एवढे झाले आहे. सध्या 23 लाख 44 हजार 919 व्यक्ती होमक्कारंटाइनमध्ये आहेत तर 2960 व्यक्ती संस्थात्मक क्कारंटाइन आहेत. राज्यात 53 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची आज नोंद झाली आहे.

























































