
जोगेश्वरी येथे तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोहम्मद शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. घडल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मोहम्मद हा जोगेश्वरी पूर्वच्या झुला मैदान परिसरात कुटुंबीयांसोबत राहत होता. तो त्याच्या वडिलांसोबत बर्फाच्या फॅक्टरीमध्ये काम करायचा. मंगळवारी दुपारी मोहम्मद वरच्या मजल्यावर गेला. सायंकाळी त्याच्या कुटुंबीयांनी वरच्या मजल्यावरचा दरवाजा ठोकला, मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे शेजारी राहणारा एक जण मोहम्मदच्या घराच्या पत्र्यावर चढला. तेव्हा मोहम्मद हा त्याला गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. त्याने याची माहिती मोहम्मदच्या वडिलांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी दरवाजा तोडून ते आत शिरले. मोहम्मदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येच्या घटनेची माहिती समजताच मेघवाडी पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी मोहम्मदच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.































































