
पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला क्राइम ब्रँच युनिट 8ने अटक केली. सोमनाथ म्हात्रे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तूल आणि 7 जिवंत काडतुसे जप्त केली आहे. नोकरी गेल्याने सोमनाथ हा अवैध धंद्यात आला.
वांद्रे टीचर कॉलनी येथे एक जण पिस्तुलाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती युनिट 8चे पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांना मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दीपक सावंत, कारंडे, शेलकर, महाजन, पोवार आदी पथकाने सापळा रचून बुधवारी रात्री सोमनाथ याला टीचर कॉलनी येथे अटक केली.



























































