
उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये रस्ते अपघाताची दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेश परिवहन निगमच्या बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत बसमधील प्रवासी दबले होते. बसमध्ये 40 प्रवासी होते. त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहीजणांचा प्रकृती गंभीर आहे. बस वेगात असल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ही बस भरधाव वेगात असून दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. त्यावेळी हा अपघात झाला. बाराबंकी चौका घाट क्रॉसिंगजवळ हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्याला सुरुवात केली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील काहीजणांची प्रकृती गंभीर आहे.
बलरामपूरहून लखनऊकडे जात असताना घाघरा नदीजवळ चौका घाट क्रॉसिंगजवळ चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. त्यानंतर काय झाले आम्हाला समजले नाही. नंतर पोलिसांनी आम्हाला रुग्णालयात दाखल केले, असे एका प्रवाशाने सांगितले. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 40 प्रवासी होते. या दुर्घटनेत बसच्या चालकाच्या हाताला दुखापत झाल्याचे बसच्या वाहकाने सांगितले.




























































