
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असतानाच आता साथीचे आजारही आटोक्यात आल्याने समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. यामध्ये मलेरिया, गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत गेल्या महिन्याच्या तुलनेत निम्म्याने घट झाली आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाशी लढा देत आहे, मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनासोबत साथीचे आजारही आटोक्यात येत नसल्याने पालिकेचे टेन्शन वाढले होते, मात्र डिसेंबर 2021 च्या तुलनेत आता जानेवारीत साथीचे आजार आटोक्यात आले आहेत. यामध्ये डिसेंबर महिन्यात मलेरियाच्या 288 रुग्णांची नोंद झाली होती. या तुलनेत जानेवारीत आतापर्यंत मलेरियाचे 153 रुग्ण आढळले आहेत, तर गॅस्ट्रोचे 433 रुग्णांची संख्या आता 239 पर्यंत खाली आली आहे.
असे घटले रुग्ण
- डिसेंबरमध्ये लेप्टोचे 4 तर जानेवारीत 1, डिसेंबरमध्ये डेंग्यूचे 40 रुग्ण होते ही संख्या जानेवारीत 1 वर आली. डिसेंबरमध्ये हिपेटायटीसचे 37 रुग्ण आढळले होते. जानेवारीत 25 रुग्णांची नोंद झाली आहे. चिकुनगुनियाचे 12 रुग्ण डिसेंबरमध्ये आढळले होते, तर जानेवारीत एकच रुग्ण आढळला आहे, तर ‘एच1एन1’ रुग्णांची संख्याही जानेवारीत शून्यावर राहिली आहे.
1 ते 30 जानेवारीपर्यंत रुग्णांची स्थिती
- मलेरिया – 153
- डेंग्यू – 7
- गॅस्ट्रो – 239
- हिपेटायटीस – 25
- चिकुनगुनिया – 1
- लेप्टो – 1



























































