कोरोनातून बरे झालात तरी वर्षभर हृदयविकाराचे टेन्शन! अमेरिकन अभ्यासकांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनातून बरे झालात तरी वर्षभर हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित गुंतागुंतीचे आजार उद्भवू शकतात, असा धक्कादायक दावा अमेरिकेतील अभ्यासकांनी एका अहवालाद्वारे केला आहे.

नेचर मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात संशोधकांनी म्हटलेय, कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीला एक महिना ते एक वर्ष या कालावधीत आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यांना छातीत वारंवार जळजळ होणे, रक्ताच्या गुठळ्या होणे, अर्धांगवायू, हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, हृदयक्रिया बंद पडणे अशा आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात अथवा मृत्यूदेखील ओढावू शकतो.

संशोधनातून आम्हाला जे दिसले ते फारच धक्कादायक आहे. कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीला हृदयाशी आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित गंभीर आजार उद्भवू शकतात अथवा मृत्यूदेखील ओढावू शकतो – झियाद अल- अली, सहाय्यक प्राध्यापक, वॉशिंग्टन विद्यापीठ