
सीमा सुरक्षा दलाने आज पंजाबच्या गुरुदासपूर सेक्टर येथे एक लाख रूपये रकमेसह सुमारे चार किलो आरडीएक्स, चीन बनावटीचे दोन पिस्तूल, दोन मॅगझीन, तीन इलेक्ट्रिनिक डिटोनेटर्स, टाईमर असे बॉम्ब बनवण्याचे साहित्य हस्तगत केल्या आहेत. पाकिस्तानच्या हद्दीतून आलेल्या ड्रोनने हिंदुस्थानच्या हद्दतील एका शेतात काही वस्तू टाकल्याचे निदर्शनास येताच बीएसएफने घाग्गर आणि सिंघोके या गावाच्या परिसरात शोध मोहिम राबवली. यामध्ये दोन पिवळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये आरडीएक्ससह इतर वस्तू आढळल्याचे बीएसएफने म्हटले आहे.

























































