
‘मी मोदींचे का ऐकू? त्यांनी नोटाबंदी, जीएसटीच्या माध्यमातून देशातील लघु आणि मध्यम उद्योजक, शेतकरी आणि कामगार यांचे मोठे नुकसान केले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. उलट त्यांच्या उद्धटपणामुळे मला हसू येते, अशी खोचक टीका कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी सध्या उत्तराखंडमध्ये निवडणूक प्रचार दौऱयावर असून पंतप्रधान मोदी सातत्याने कॉँग्रेसवर करत असलेल्या टीकेला त्यांनी आज प्रत्युत्तर दिले. मोदी म्हणतात ‘राहुल गांधी ऐकत नाहीत. तुम्हाला याचा अर्थ कळला का? याचा अर्थ ईडी किंवा सीबीआयचा दबाव टाकला तरी ते मागे हटत नाहीत. ते ऐकत नाहीत असे त्यांना म्हणायचेय, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्यांचा पूर्ण केळ काँग्रेसबद्दल बोलण्यासाठी दिला. पण त्यांनी चीनबाबत मी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर दिले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

























































