
रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) परिस्थिती आणखी गंभीर झाली असून दोन्ही देशांमध्ये युद्धाचे ढग घोंघावू लागले आहेत. येत्या आठवड्यामध्ये रशिया युक्रेनवर हलाई हल्ला करू शकतो अशी शक्यता जगभरातून व्यक्त केली जात आहे. कोविडमुळे आधीच बेजार झालेल्या जगाला हे युद्ध परवडणारे नाही. अशात अमेरिकेचे राष्ट्राक्ष्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुनिन (Russian President Vladimir Putin) यांच्याशी युक्रेनबाबत फोनवर चर्चा केल्याचे वृत्त आहे.
व्हाईट हाऊसने बायडेन आणि पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाल्याच्या वृत्तांना दुजोरा दिला आहे. दोघांमध्ये शनिवारी फोनवर चर्चा झाली. बायडने आणि पुतिन यांच्यात तब्बल 62 मिनिटे गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. यावेळी बायडेन यांनी पुतिन यांना तणाव कमी करण्याचा आणि युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेल्या एक लाख रशियन सैनिकांना मागे बोलावण्याचा सल्ला दिला.
युक्रेन सोडा
दरम्यान, अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने रशिया युक्रेवर हवाई आणि समुद्रीमार्गे हल्ला करू शकतो असे संकेत दिले होते. त्यानंतर अमेरिकेने आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला असून अमेरिकन दुतावासातील कर्मचाऱ्यांनाही युक्रेनमधून सोडण्यास सांगितले आहे. अमेरिकेप्रमाणे ब्रिटनने देखील आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बुधवारपूर्वी बाहेर पडण्यास सांगितले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध होणार हे निश्चित मानले जात आहे.
Russia Ukraine – माझ्या शक्ती वापरून युद्ध थांबवून दाखवतो! जगप्रसिद्ध जादूगाराचा दावा
लवकरच हल्ला होणार
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध अटळ मानलं जातंय. या युद्धाला कोणत्याही क्षणी सुरुवात होईल असं सांगितलं जात आहे. जर्मनीतील एका वर्तमानपत्राने युद्धाची निश्चित तारीख जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे. रशिया बुधवारी युक्रेनवर आक्रमण करेल असे ‘देर स्पीगल’ या जर्मनीतील वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटलंय.


























































