
जम्मू-कश्मीरच्या गुलमर्ग शहरात पर्यटक सध्या बर्फाचा आनंद लुटत आहेत. काही दिवसांपूर्वी तिथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इग्लू कॅफे तयार करण्यात आले होते. त्यानंतर आता बर्फाचा ताजमहाल बनवण्यात आला आहे. 16 फूट उंच आणि 24 फूट रुंद ताजमहाल बघायला पर्यटकांनी गर्दी केली आहे.
गुलमर्गमध्ये प्रसिद्ध असलेल्या स्की- रिसोर्टसमोर बर्फाचा ताजमहाल साकारण्यात आला आहे. हॉटेलच्या कर्मचाऱयांनी उणे शून्य ते 12 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात 17 दिवसांत बर्फाच्या भिंती असलेला ताजमहाल तयार केला. ताजमहाल तयार करण्यासाठी कोणताही खर्च आला नाही. हॉटेलचे मॅनेजर सत्यजित गोपाल म्हणाले, या सुंदर ठिकाणाला लोकांनी कायमस्वरूपी स्मरणात ठेवावे यासाठी ही खास कलाकृती साकारली आहे. पर्यटक बर्फातील या कलाकृतींचा आनंद घेत आहेत. सेल्फी काढत आहेत.

























































