‘जेव्हा कुणी माझ्याशी…’ माधुरीच्या विधानाने कपिलची बोलती बंद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावरील विनोदवीर कपिल शर्मा आपल्या धमाल विनोदांनी हसवणूक करत असतो. त्याच्या अफलातून टायमिंगमुळे तो अनेक सेलिब्रिटींची बोलती बंद करतो. पण, धकधक गर्ल माधुरी दीक्षितने त्याची बोलती बंद केली आहे.

द कपिल शर्मा शो या त्याच्या कार्यक्रमात माधुरी नुकतीच तिच्या वेबसीरीजचं प्रमोशन करण्यासाठी पोहचली होती. कपिल नेहमीप्रमाणे तिच्याशी गोड बोलून तिची मस्करी करू लागला. त्याने गप्पांच्या ओघात तिला एक प्रश्न विचारला. इतक्या वर्षांत तुझ्यात काय बदल झाला आहे, असा प्रश्न कपिलने तिला विचारला.

त्यावर तिच्यासोबत आलेल्या संजय कपूरने ती वयासोबत अजून सुंदर झाल्याचं म्हटलं. त्यावर कपिल तिला म्हणाला की, जेव्हा तुझ्याशी कुणी फ्लर्ट करतं, तेव्हा तुला कसं वाटतं? त्यावर माधुरीने दिलेल्या उत्तरावर कपिलची बोलती बंद झाली. ती म्हणाली की, जेव्हा कुणी माझ्याशी फ्लर्ट करतं, तेव्हा मला डॉ. नेने यांची आठवण येते. ते उत्तर ऐकून कपिल गप्प बसला.