पंजाबच्या निवडणुकीत बाबा राम रहीम भारी, डेरा सच्चा सौदाच्या भूमिकेकडे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब विधानसभा निवडणुकीत रविवारी होत असलेल्या मतदानात डेरा सच्चा सौदाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील 117 जागांपैकी 70 जागांवर डेरा समर्थक मतदारांचा थेट प्रभाव असून डेराप्रमुख बाबा राम रहीम या निवडणुकीत कुणावर भारी पडणार याची उत्सुकता आहे. डेराप्रमुखांकडून भाजपच्या पारडय़ात मतदान करण्यासाठी कोडकर्डद्वारे आवाहन केले जाण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये डेरासमर्थक 40 लाख मतदार आहेत. डेरासमर्थकांची एकगठ्ठा मते ज्या पक्षाच्या बाजूने पडतील त्या पक्षाचे सरकार स्थापन होणार हे निश्चित. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर भाजपनेच डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असणाऱया बाबा राम रहीम याला फर्लोवर तुरुंगाबाहेर आणल्याची चर्चा आहे. अपक्ष उमेदवार परमजीत सिंह याने राम रहीमच्या फर्लो रजेला आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे डेरासमर्थकांची मते भाजपकडे वळविण्याबाबतची सर्क चर्चा पूर्ण झाली असली तरी डेराप्रमुखांकडून उघडपणे याबाबत आवाहन करण्यात आलेले नाही.

नोटा दाबणार असल्याची अफवा
शनिवारी सकाळी डेरा समर्थकांमध्ये नोटा (वरीलपैकी काहीही नाही) बटण दाबण्याचा मॅसेज व्हायरल झाला. डेराच्या राजकीय शाखेने याचा साफ इन्कार केला आहे. यावरून हेही स्पष्ट झाले की, डेरा सच्चा सौदाने कोणत्या ना कोणत्या पक्षाला एकगठ्ठा मतदान करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. डेराने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत.

कॉँग्रेसबाबत अनुयायांत नाराजी
कॉँग्रेस राजवटीत बाबा राम रहीम यांना तुरुंगात टाकल्याने डेरा आणि त्यांचे अनुयायी प्रचंड नाराजी आहे. दोन दिवसांपूर्वी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनीही डेरा कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.

आम आदमी पार्टीला फटका
डेरा समर्थकांनी भाजपच्या बाजुने एक गठ्ठा मतदान केल्यास आम आदमी पार्टीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. डेराच्या अनुयायांचा प्रभाक विशेषतŠ पंजाबमधील माळका भागात आहे, जिथे आम आदमी पक्ष खूप मजबूत मानला जातो. डेरामुळे एक-दोन टक्के मते जरी भाजप किंवा अन्य कुणाच्या बाजूने वळली, तरी आपला भारी पडेल.