हॅरिस ढाल क्रिकेट स्पर्धेचा 125वा वर्धापन दिन; आज ब्रेबॉर्नवर रंगणार सीसीआय-पत्रकार संघातील मैत्रीपूर्ण टी-20

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॅरिस ढाल शालेय क्रिकेट स्पर्धेला यंदा 125 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुंबई स्पोर्ट्स स्कूल असोसिएशनने (एमएसएसए) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) अध्यक्षीय संघ आणि एमएसएसए  पुरस्कृत  क्रीडा पत्रकार संघांत प्रदर्शनीय टी-20 क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे.

सोमवारी दुपारी 12.30 वाजल्यापासून सीसीआय अध्यक्षीय संघ आणि क्रीडा पत्रकार संघांत प्रदर्शनीय क्रिकेट सामना रंगणार आहे. या लढतीच्या दरम्यान हॅरिस ढाल क्रिकेट स्पर्धेच्या 125 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शालेय क्रिकेटपटूंना क्रिकेट फॉर केअरचे श्याम भाटिया यांच्या वतीने विनाशुल्क क्रिकेट किट भेट दिले जाणार आहे. याप्रसंगी छोटे क्रिकेटपटू आणि उपस्थित मान्यवरांना चिअर करण्यासाठी क्रिकेटशौकिनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन एमएसएसएचे मानद सरचिटणीस एसमेरो फिग्युरेडो यांनी केले आहे.

22 फेब्रुवारीपासून रंगणार हॅरिस ढाल लढती

लोकप्रिय हॅरिस ढाल क्रिकेट स्पर्धेच्या साखळी लढती 22, 23 आणि 25 फेब्रुवारीला रंगणार आहेत, तर जेतेपदासाठीची अंतिम लढत 6 ते 8 मार्च 2022 या कालावधीत सीसीआयच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे.