
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीपीबी) विविध प्रकारची बिल भरणा करणे सोपे जावे यासाठी बीबीपीएस कॅश-टू-बिल सुविधेला सुरुवात केली आहे. बीबीपीएस अभियानाला चालना देण्यासाठी आयपीपीबीने 1 नोव्हेंबर 2021 ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत एक विशेष अभियान राबवले होते. त्यातील पाच एंड युजर्स विजेत्यांचा 25 फेब्रुवारीला मुंबईच्या जीपीओ भवन येथे सत्कार केला जाणार आहे. विजेत्यांच्या नावाची घोषणा 16 फेब्रुवारीला करण्यात आली होती. कॅश टू बिल सुविधेमुळे कोणतीही व्यक्ती पोस्टात जाऊन पोस्ट पेमेंट बँकेतील खात्याशिवायदेखील जीडीएस, पोस्टमन किंवा डाक हाय्यकाच्या माध्यमातून रोख पद्धतीने बिल भरणा करू शकतात.


























































