
पत्ता चुकण्याच्या त्रासातून वाचण्यासाठी सध्या हमखास वापरलं जाणारं अॅप म्हणजे गुगल मॅप्स. दोन पायांच्या माणसापासून ते चार चाकी गाडीपर्यंत सगळे या मॅप्सवर अवलंबून असतात, इतकं हे फायदेशीर अॅप आहे. पण, या अॅपच्या माध्यमातून अनेकजण पैसेही कमवतात.
गुगल मॅप्स हे अॅप त्यांच्यातील सुधारणांसाठी ज्यादा पॉईंट्स देतं. म्हणजेच जर गुगल मॅपमध्ये काही दुरुस्ती असेल तर ती तुम्ही नोंदवू शकता. या अॅपचा वापर करून तुमचा अनुभव आणि समीक्षा देखील नोंदवता येऊ शकते. मॅप्स हे अॅप्लिकेशन अधिकाधिक अचूक होण्याच्या दृष्टीने ही सोय करण्यात आली आहे.
मॅप्सचा रिव्ह्यू, फोटो, व्हिडीओ, प्रश्नोत्तरं, हरवलेल्या जागा इत्यादींच्या अचूक माहितीसाठी आणि माहिती पडताळणी केल्यास गुगल तुम्हाला पॉइंट्स देतं. जर तुम्ही रिव्ह्यू लिहिलात तर तुम्हाला 10 पॉइंट्स दिले जातात. एखाद्या जागेचं नाव एडिट करण्यासाठी 5 पॉइंट्स, व्हिडीओसाठी 7 पॉइंट्स, उत्तरासाठी 1 पॉइंट, एडिटसाठी 5 पॉइंट्स आणि एखाद्या जागेला किंवा रस्त्याला अॅड करण्यासाठी 15 पॉइंट्स दिले जातात.
तुमचे पॉइंट्स जसजसे वाढत जातात, तशी तुमची लेव्हलही वाढत जाते. जेव्हा एखादी व्यक्ती 250 पॉइंट्स मिळवते तेव्हा तिला एक स्टार दिला जातो. अशाच प्रकारे 1500, 5000, 15000 आणि पुढे अशी ही यंत्रणा पुढे सरकते. हे पॉइंट्स गुगल प्ले स्टोअरवर रिडीम करता येतात. अर्थात थेट नाही पण प्ले स्टोअरवर तुम्ही पैसे कमवू शकता.
या खेरीज मॅप अॅनालिस्ट नावाचा एका पोस्टवरही तुम्ही मॅपची अचूकता राखण्यासाठी काम करू शकता. इथे तासांच्या हिशोबाने पैसे दिले जातात.





























































