
तपास यंत्रणांचा वापर करूनही महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही टोकाची भूमिका घेतली, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह प्रकरणावर लगावला. सरकारी अधिकाऱयांची 125 तासांची रेकॉर्डिग होते ही काwतुकास्पद बाब आहे. पेंद्रीय तपास यंत्रणांशिवाय हे अशक्य आहे, अशी खोचक टिपण्णीही शरद पवार यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह दाखवत सरकारी वकील प्रवीण चव्हाण कार्यालयात गिरीश महाजन यांच्याविरोधात षड्यंत्र रचण्याचे कारस्थान करण्यात आल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, ‘ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. मला काwतुक वाटतं, एका शासकीय अधिकाऱयाच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधित 125 तासांची रेकार्ंडग करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले. याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशेब केला तर शक्तिशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी या फक्त हिंदुस्थान सरकारकडे आहेत. त्यामुळे राज्यात जाऊन राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात जाऊन तासन्तास जे काही काम केले, जे रेकॉर्ड करण्यात ते यशस्वी झाले ते खरे आहे की नाही ते सिद्ध झाले पाहिजे,’ असेही शरद पवार म्हणाले.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही
शरद पवार यांनी यावेळी नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. ‘नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा संबंधच नाही. नवाब मलिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असून मुस्लिम कार्यकर्त्याचे नाव दाऊदशी जोडायचे हे घृणास्पद आहे,’ असे शरद पवार म्हणाले.
अनिल देशमुखांवर 90 छापे टाकले, हे सत्तेच्या गैरवापराचे उत्तम उदाहरण
अनिल देशमुखांविरोधात 90 छापे टाकण्यात आले. सत्तेचा गैरवापर करून चौकशी केली जाते याचे उत्तम उदाहरण अनिल देशमुखांचे आहे. माझी एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात कार्य करते तेव्हा त्यावर शहानिशा न करता बोलणं योग्य नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. माझे अप्रत्यक्षपणे नाव घेतले गेले, पण याच्याशी माझा काहीही संबंध नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता-असत्यता तपासेल. माझे कधी यासंबंधात कुणाशी बोलणे व्हायचे कारण नाही. कधीकाळी देवेंद्र फडणवीसांच्या सहकाऱयाबाबत तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं, त्यात सत्यता किती तुम्ही पहा. तुमच्या सहकाऱयाबाबतची ही तक्रार आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात कार्य करते तेव्हा त्यावर शहानिशा न करता बोलणं योग्य नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही.’






























































