बेस्ट ऑफ लक! आजपासून दहावीची परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावीची लेखी परीक्षा उद्या 15 मार्चपासून सुरू होत आहे. राज्यातील 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून 5 हजार 50 मुख्य केंद्र आणि 16,334 उपपेंद्र मिळून एकूण 21,384 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षेची वैशिष्टय़े

  • 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित पेपर
  • 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे जादा
  • प्रश्नपत्रिका वाचनासाठी अतिरिक्त 10 मिनिटे
  • विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र

हेल्पलाइन

020-25705271,
020-25705272

मुंबई विभागातून 3 लाख 74 हजार विद्यार्थी परीक्षा देणार

मुंबई विभागातून 3 लाख 73 हजार 840 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. मुंबई दक्षिण 33,490; मुंबई पश्चिम 65,497; मुंबई उत्तर 52,868; ठाणे 1 लाख 24 हजार 123, पालघर 61,866 तर रायगडमधील 36 हजार 996 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.