
एका शिक्षकाने दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याची घटना राजस्थानमधील नागौर येथे घडली आहे. दुसऱ्या बहिणीवर बलात्कार झाल्यानंतर मोठ्या बहिणीने आपल्यावर घडलेल्या बलात्काराची घटनाही सांगितली. तेव्हा हा भीषण प्रकार उघडकीला आला.
या विकृत शिक्षकाचं नाव हरिराम असं आहे. हरिराम पीडितांच्या शाळेत शारीरिक शिक्षणाचा विषय शिकवतो. त्याने या दोन्ही बहिणींपैकी मोठ्या बहिणीवर 2018 आणि 2019मध्ये दोन वेळा बलात्कार केला होता. या वेळी ही पीडिता नववी आणि दहावीच्या वर्षात होती. हरिरामने तिच्यावर शाळेतच बलात्कार केला होता.
या घटनांनी व्यथित झालेल्या पीडितेने शाळा सोडली होती. मात्र, 5 मार्च रोजी हरिरामने पीडितेच्या बहिणीवरही बलात्कार केला. बहिणीने ही घटना कुटुंबाला सांगितली. बहिणीला झालेल्या त्रास पाहून पीडितेने हरिरामने आपल्यासोबतही असंच कृत्य केल्याचं तिने आई वडिलांना सांगितलं.
त्यानंतर पीडित बहिणींच्या काकाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितांचे जबाब नोंदवले असून हरिरामविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



























































