प्रसिद्ध अभिनेत्री शमा सिकंदर अमेरिकन बॉयफ्रेंडसोबत अडकली लग्नबंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असलेली शमा सिकंदर ही तिचा लाँग टाईम बॉयफ्रेंड जेम्स मिलिरॉनसोबत लग्नबंधनात अडकली आहे. त्या दोघांनी सोमवारी गोव्याच्या किनारी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. शमाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

शमाने वयाच्या चाळीसाव्या वर्षी लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शमा व जेम्स त्यांच्या लग्नाआधीच्या धामधूमीचे फोटो शेअर करत असायची. रविवारी त्यांचा संगीत सोहळा पार पडला. कोरोनामुळे त्यांचे लग्न लांबणीवर पडले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

शमा व जेम्स हे 2015 पासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचा 2016 साली साखरपुडा झाला होता. जेम्स हा अमेरिकन असून शमा व तो गोव्यात एकत्र राहतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)