
आपल्या देशात हजारो प्रकारची मिठाई मिळते. 200 रुपये किलो पासून ते हजारो रुपये किलो पर्यंतची मिठाई मिळते… पण देशात अशीही एक मिठाई मिळते जिचा एक तुकडा देखील पाचशे ते हजाराच्या किंमतीत मिळतो.
लखनौच्या छप्पन भोग या मिठाईच्या दुकानात चक्क 50000 रुपये किलोची मिठाई मिळते. या मिठाईसाठी परदेशातून सुका मेवा मागवला जातो. त्यासाठी लागणारे ममरा बदाम हे इराणवरून, पिस्ता हे अफगाaणिस्तानवरून, हेजलनट तुर्कीवरून तर ब्ल्यू बेरी अमेरिकेवरून मागवलेली असते. या सर्व ड्रायफ्रूट्सचे मिश्रण या मिठाईत असून त्यावर 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावला जातो. प्रसिद्ध फूड अमर सिरोहीने त्याच्या चॅनेलवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे
























































