मुलांच्या सोशल मीडियावर पालकांचा वॉच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाकाळात सुरू असलेल्या ऑनलाइन लेक्चरमुळे हल्ली प्रत्येक मुलाच्या हातात स्मार्टफोन दिसू लागले आहेत. अभ्यासाशिवायदेखील मुले फोनवर जादा वेळ घालवताना दिसत आहेत. योग्य-अयोग्य याची समज नसल्यामुळे मुले सोशल मीडियावर अॅडल्ड साइट्स फॉलो करतात. मुलांची ऑनलाइन सुरक्षितता लक्षात घेता इन्स्टाग्राम लवकरच एक भन्नाट फीचर लाँच करणार आहे.

नवीन फीचरमुळे आपली मुले इन्स्टाग्रामवर कोणते पेज किंवा कोणत्या व्यक्तीला फॉलो करतात याची माहिती पालकांना सहज मिळणार आहे. याशिवाय आपली मुले इन्स्टाग्रामवर किती वेळ घालवतात हे ट्रक करण्याची परवानगी पंपनी पालकांना देणार आहे.लवकरच पालकांच्या देखरेखीचे फीचर (parental supervision features) क्वेस्ट व्हर्च्युअल रियालिटी हेडसेवर आणणार असल्याची माहिती मेटा कंपनीने दिली आहे. सर्वप्रथम अमेरिकेतील युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध होईल. पुढील काही महिन्यांत जगभरातील युजर्ससाठी हे फीचर रोलआऊट केले जाईल.

सोशल मीडिया वापरणाऱया मुलांच्या संरक्षणाचा एक भाग म्हणून हे नवीन फीचर पंपनीने आणले आहे. मे महिन्यात पंपनी डॅशबोर्ड लाँच करणार असून ज्यामुळे मुलांच्या वयासाठी अयोग्य अॅप्स आपोआप ब्लॉक होतील.