
मुल होत नसल्यामुळे पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना आंबेगाव बुद्रुकमधील वेताळनगर परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. काजल देवानंद काळेल (वय 24, रा. रा. वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. देवानंद मच्छिंद्र काळेल (वय 30, रा. वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक) याला पोलिसांनी अटक केली आहे. काजल हिचे वडील मारूती बाड (वय 57, रा. भिवंडी, ठाणे) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल आणि देवानंदचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. देवानंद हा मूळचा माण तालुक्यातील असून तो पुण्यात इमारतींना रंग देण्याची कामे करतो. लग्नानंतर त्यांना मुलबाळ होत नसल्याने तो पत्नीला त्रास देत होता. किरकोळ कारणावरूनही पत्नीचा छळ करत होता. शुक्रवारी दि. 18 मार्चला रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. त्यावेळी देवानंदने काजलला मारहाण करीत गळा आवळून तिचा खून केला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी देवानंदला अटक केली.
































































