मुंबईत कोरोनाचे 29 रुग्ण, एकही मृत्यू नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आज दिवसभरात कोरोनाचे 29 रुग्ण सापडले तर एकही मृत्यू झाला नाही. मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून मुंबई महापालिकेने आज 8 हजार 708 कोरोना चाचण्या केल्या.

यात 27 जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकही रुग्ण ऑक्सिजन बेडवर नसल्याचे महापालिकेने म्हटले आहे. दरम्यान, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 98 टक्के इतके असून दिवसभरात 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, राज्यातही कोरोनाचे रुग्ण घटले असून आज दिवसभरात 113 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला.

धारावी-दादर-माहीम झीरो पॉझिटिव्ह, सक्रिय रुग्ण केवळ पाच

मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर, माहीम आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या दाटीवाटीच्या धारावीत आज एकही रुग्ण सापडला नाही तर सक्रिय रुग्णांची संख्या एक आकडी झाली आहे. धारावीत 1, माहीममध्ये 2 आणि दादरमध्ये 2 सक्रिय रुग्ण आहेत. एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नाही. गृह विलगीकरणात धारावीत 1, माहीम आणि दादरमध्ये प्रत्येकी 2 व्यक्ती आहेत.