प्रवासी तरुणीचा मोबाईल हिसकावणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकलची वाट बघत उभीअसलेल्या प्रवासी तरुणीच्या हातातला आयफोन हिसकावून पळ काढणाऱ्या चोराला रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ पडले. किरण( 24, नाव बदलेले) ही तरुणी लोकलची वाट बघत चर्चगेट स्थानकात मोबाईलवर बोलत उभी होती. दरम्यान, अचानक एका तरुणाने तिच्या हातातला आयफोन हिसकावून पळ काढला. प्रवासी तरुणीने आरडाओरड केल्याने ड्युटीवर तैनात असलेल्या रेल्वे पोलीसांनी त्याला पडले. भैय्या पाटील असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला. पाटील हा धुळ्याचा रहिवासी असून नोकरीच्या शोधात तो मुंबईत आला होता. त्याने आणखी मोबाईल चोरीचे गुन्हे केलेत का याचा पोलिस शोध घेत आहेत.