
आळंदी येथील मोशी गिलबिले नगरमधील श्री कानिफनाथ महाराज मंदिरात रंगपंचमीनिमित्त कानिफनाथ यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडली. यावेळी विविध परंपरागत धार्मिक ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत गिलबिले यांच्या हस्ते श्रींना मंगलमय वातावरणात अभिषेक करण्यात आला. नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांनी रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली होती. त्यानिमित्त ही यात्रा धार्मिक उपक्रमांनी साजरी केली जाते. यावेळी पिंपरी-चिंचवड परिसरातील हजारो भाविकांनी कानिफनाथांच्या दर्शनाचा व महाप्रसादा चा लाभ घेतला.
संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. विष्णू तापकिर, मुक्ताजी गिलबिले, संभाजी लांडगे, गुलाब वहिले, शिला ढमढरे, मंदा थोरात, आदेश गिलबिले, अशोक म्हस्के, रोहिदास धायरकर, सोनबा पवार आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी कानिफनाथ मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत गिलबिले यांनी विविध कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
























































