वानखेडे स्टेडियम, ट्रायडंट हॉटेलची दहशतवाद्यांकडून रेकी झाल्याची माहिती नाही, मुंबई पोलिसांकडून स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वानखेडे स्टेडियम, ट्रायडंट हॉटेल तसेत हॉटेल ते स्टेडियम पर्यंतच्या मार्गाची दहशतवाद्यांनी रेकी केली आसल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यानंतर कुठल्याही संस्थेकडून रेकी झाल्याबाबतचे इनपुट किंवा माहिती मिळालेली नसल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. तर ट्रायडंट हॉटेलमध्ये खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असणार आहे. या दोन्ही ठिकाणची तसेच हॉटेल ते स्टेडीयम पर्यंतच्या मार्गाची दहशतवाद्यांनी रेकी केली असुन याबाबत सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांना अॅलर्ट केले असल्याचे वृत्त आज काही वृत्तवाहिन्यांमधून दाखवले जात होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी एक पत्रक प्रसिद्ध करून अशी कोणतीही रेकी दहशतवाद्यांकडून झालेली नाही. शिवाय रेकी झाल्याबाबद कुठल्याही सुरक्षा यंत्रणेकडून इनपुट किंवा माहिती मिळालेली नसल्याचे पोलिसांनी त्या पत्रकातून स्ष्ट केले आहे.

दरम्यान, आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी वानखेडे स्टेडीयम, हॉटेल्समध्ये चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. तसेच हॉटेल ते स्टेडियम पर्यंतच्या मार्गावर देखील पोलीस तैनात असतील. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना हाती घेण्यात आल्या असल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.