
येत्या दोन वर्षांमध्ये चंद्रापर्यंत वायफाय सुविधा पोहोचेल. म्हणजेच चंद्रावर येत्या काही वर्षांत हाय-स्पीड इंटरनेट सुविधा मिळू शकते. अमेरिकेच्या एका स्टार्टअप कंपनीने हा दावा केला आहे.
अॅक्वेरिअन स्पेस असे या कंपनीने नाव आहे. त्यांनी दोन वर्षांत चंद्रावर वायफाय आणि त्यानंतर मंगळावर इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनीला आतापर्यंत 6 लाख 50 हजार डॉलर रुपये निधी मिळाला आहे. पंपनीचे सीईओ पॅली लार्सेन यांनी सांगितले की, 2021 पर्यंत चंद्राच्या आजूबाजूला 13 लँडर्स, ऑर्बिट्स आणि रोव्हर्स होते. 2030 पर्यंत ही संख्या 200 होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक अब्ज-ट्रिलियन लुनार अर्थव्यवस्थेची निर्मिती होईल, परंतु यासाठी मजबूत कम्युनिकेशन आवश्यक आहे, जो सोलनेटद्वारे उपलब्ध होईल. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील उपग्रह नेटवर्क 100 मेगाबाइट/सेपंद वेगाने धावेल, असा पंपनीचा दावा आहे. यासोबतच चंद्र आणि मंगळाची शास्त्र्ााrय माहितीही गोळा केली जाणार आहे.
























































