
कोर्डिलिया क्रुज ड्रग्ज प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीला आणखी 90 दिवसांची मुदत पाहिजे आहे. तसा अर्जच एनसीबीने सत्र न्यायालयात केला आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आरोपी दाखवले आहे.
कार्डिलिया क्रुज ड्रग्ज प्रकरणाचे आरोपपत्र दोन एप्रिलच्या आत एनसीबीला दाखल करायचे होते. पण आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 90 दिवसांची मुदत वाढवून मिळावी, असा विनंती अर्ज सोमवारी एनसीबीच्या वतीने कोर्टात करण्यात आला. गेल्या ऑक्टोबर महिन्यात एनसीबीने कोर्डिलिया क्रुजवरील पार्टिमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंड, मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य तरूण तरूणींना मिळून 19 जणांना पकडले होते. त्यानंतर आर्यन खान, अरबाज यांना आर्थर रोड कारागृहात काही दिवस जावे लागले होते. दरम्यान हायकोर्टाने जामिन मंजूर केल्यानंतर आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाली. याप्रकरणी एनसीबीला दोन एप्रिलपर्यंत कोर्टात आरोपपत्र दाखल करायचे होते. पण आता एनसीबीने याकरिता आणखी 90 दिवसांची मागणी केली आहे.




























































