अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कथित 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयमार्फतच चौकशी सुरू राहणार आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. आम्ही या प्रकरणाला स्पर्शही करणार नाही, असे न्यायालय म्हणाले. सीबीआयचे संचालक एस. के. जयस्वाल हे राज्याचे पोलीस महासंचालक होते. त्यामुळे पोलीस अधिकाऱयांशी संबंधित चौकशी निष्पक्ष होऊ शकत नाही असे म्हणणे महाराष्ट्र सरकारने मांडले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. त्याला महाराष्ट्र सरकारने याचिकेद्वारे आव्हान दिले होते.