महागाईविरोधात युवासेनेचे थाळीनाद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत रोजच वाढ केली जात आहे. गॅस सिलिंडरची किंमतही हजाराच्या जवळ गेली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांना मोठा फटका बसत आहे. मात्र, केंद्र सरकाकडून कोणताही दिलासा दिला जात नसल्याने युवासेनेकडून पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. कोरोनाकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थाळीनाद करण्यास सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर थाळीनाद करून महागाईला पळवून लावण्यासाठी हे उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.

कोल्हापुरात दुचाकीला हार घालून श्रद्धांजली

कोल्हापूर – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई कमी करण्यासाठी युवासेनेच्या वतीने आज सायंकाळी येथील एका पेट्रोल पंपावर चक्क दुचाकीला हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. कोरोनाच्या महामारीत दोन वर्षांपूर्वी थाळी वाजवून कोरोना संसर्गाला पळविण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याच पद्धतीने थाळी वाजवून महागाई जाऊ दे म्हणत थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हा अधिकारी मंजित माने, विनायक जाधव, सागर पाटील, अभिनयन कानकेकर, शेखर बारटक्के, अवदेश करंबे, वैभव जाधव, कुणाल शिंदे, उंचगावच्या उपसरपंच स्वाती जाधव, श्वेता सुतार, काजल दुकांडे, श्वेता चितारे, सानिका दामूगडे, सुहास चौगुले, मंगेश चितारे, रोहित वेढे, रघुनंदन भावे, सचिन नागटिळक, अमित सोलापुरे उपस्थित होते.

राधानगरीत झालेल्या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक रवींद्र पाटील, तालुका युवा अधिकारी ओंकार पाटील, उपतालुका युवा अधिकारी ओंकार आरडे, शहर युवा अधिकारी निखिल आंबेकर, उपशहर युवा अधिकारी प्रमुख प्रसाद डवर उपस्थित होते. हुपरी शहरात झालेल्या आंदोलनावेळी युवासेनेचे शिवाजी जाधव, अर्जुन जाधव, महिला आघाडी तालुका संघटक उषा चौगुले, शहर संघटक मीना जाधव आदी उपस्थित होते.

कराड बसस्थानकाजवळील आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख शशिराज करपे, उपशहरप्रमुख अक्षय गवळी, महिला आघाडीच्या अनिता जाधव, रामभाऊ खंडागळे, सतीश तावरे, अक्षय मोहिते यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते. महाबळेश्वर येथील सुभाषचंद्र बोस चौकात शहर युवा सेनेतर्फे उपजिल्हा युवा अधिकारी सचिन वागदरे व शहर युवा अधिकारी आकाश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.

शिर्डीत झालेल्या आंदोलनावेळी युवासेनेचे राहाता तालुका अधिकारी संदीप विधे, शहर युवा अधिकारी अतुल कमलाकर कोते, उपतालुका युवा अधिकारी किरण जपे, अमर गायकवाड, दीपक खैरनार, विराज गोंदकर, नरेंद्र पगार, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. नेवाशात शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप, युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी शुभम उगले, तालुका अधिकारी कैलास लष्करे, शहर युवा अधिकारी महेश गरुटेल शिवाजी जंगले उपस्थित होते.

सोलापूर शहरात युवासेना जिल्हा अधिकारी महेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष चव्हाण, उपजिल्हा अधिकारी लखन शिंदे उपस्थित होते. मोहोळमध्ये झालेल्या आंदोलनावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, युवासेना जिल्हा अधिकारी महेश देशमुख, उपजिल्हा अधिकारी लखन शिंदे, शहर युवा अधिकारी सचिन जाधव, हर्षल देशमुख, संतोष चव्हाण उपस्थित होते. करमाळ्यात झालेल्या आंदोलनावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवासेना शहर अधिकारी विशाल गायकवाड, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रियांका गायकवाड, उपतालुकाप्रमुख बंडू शिंदे, संजय शिलवंत, समाधान फरतडे आदी उपस्थित होते. मिरजेत झालेल्या आंदोलनात युवासेना जिल्हा अधिकारी सचिन कांबळे, उपजिल्हा अधिकारी मोहसीन मुल्ला, तालुका अधिकारी धैर्यशील मोरे, भरतकुमार पाटील, मयूर गायकवाड उपस्थित होते.