
बापाची जमीन विकून प्लॉट घेण्यासाठी पैसे आणावेत व विवाहितेस गळफास लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवऱ्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी आश्विनी विकास धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, 2016 रोजी फिर्यादीचे विकास हणमंत धुमाळ (रा. तळेगाव ता. शिरुर अनंतपाळ) याच्यासोबत रितीरिवाजाप्रमाणे झाले. पाच लाख रुपये वरदक्षिणा, सात तोळे सोने व इतर संसारपयोगी साहित्य असा 15 लाख रुपयांचा खर्च वडिलांनी लग्नासाठी केला.
लग्नानंतर एक महिना चांगले वागवले, पण त्यानंतर ‘लग्नात तुझ्या बापाने आम्हाला करणी धरणी केली नाही’ म्हणून मारहाण करणे, टोचून बोलणे, शारीरिक मानसिक छळ करणे, चारचाकी घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये’, म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. 2017 मध्ये वडिलांनी 2 लाख रुपये दिले व 2018 मध्ये उर्वरित रकमेची व्यवस्था करून गाडी खरेदी करण्यासाठी पैसे दिले. 2019 मध्ये बापाची जमीन विकून आम्हाला प्लॉट घेण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून छळ करण्यात आला व घरातून हाकलून दिले.
तेव्हापासून लातूरातील मोतीनगर येथे त्या राहत होत्या. दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी नवऱ्याने मारहाण केली. नंणदेने तिच्या हातातील काठीने मारहाण केली व दोरीने गळ्याला फास लावून सासू-सासरे, नणंद, दीर यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने दोरीला ओढत असताना इतर लोकांनी फिर्यादीस वाचवले. या प्रकरणी पोलीसांनी विकास हणमंत धुमाळ (नवरा), हणमंत विठोबा धुमाळ (सासरा), छाया हणमंत धुमाळ (सासू), माया बाबुराव फावडे (नणंद), विष्णू हणमंत धुमाळ (दीर) अशा पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































