
सत्तेच्या पिचवर इम्रान खान (Imran Khan) यांना क्लिन बोल्ड झाले आहेत. मध्यरात्री संसदेमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शाहबाज शरीफ हे मुस्लिम लीग नवाजचे खासदार असून माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांचे लहान बंधू आहेत.
शाहबाज शरिी हे 13 ऑगस्ट 2018 पासून नॅशनल असेंब्लीचे सदस्य असून विरोधी पक्षनेतेही आहेत. पंजाब प्रातांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तीन वेळा कारभारही पाहिला आहे. पंजाब प्रांताचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर असून ते सध्या मुस्लिम लीग नवाजचे (PML-N) अध्यक्ष आहेत.
शाहबाज शरीफ यांचा जन्म 23 डिसेंबर 1951 रोजी लाहोरमध्ये झाला. त्यांचे वडील मोहम्मद शरीफ हे एक उद्योजक होते. उद्योगाच्या निमित्ताने ते कायम कश्मीरच्या अनंतनाग येथे येत होते आणि नंतर ते पंजाबच्या अमृतसह येथे स्थायिक झाले. परंतु 1947 ला फाळणी झाल्यानंतर मोहम्मद शरीफ आपल्या कुटुंबासह लाहोरला गेले. शाहबाज शरीफ यांची आई पुलवामाची रहिवासी होती.
शाहबाज यांनी सरकारी विद्यापीटामध्ये ग्रॅज्यूएशनपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आपला कौटुंबिक बिझनेस सांभाळणे सुरू केले. अब्बास शरीफ आणि नवाज शरीफ हे त्यांचे दोन मोठे बंधू. पैकी नवाज शरीफ यांनी तीनदा पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषवले आहे. 1973 मध्ये शाहबाज यांनी लग्न केले आणि त्यांना पहिल्या पत्नीपासून चार मुलं झाली. 2003 मध्ये त्यांनी दुसरे लग्न केले.
सत्तेच्या पिचवर इम्रान खान ‘क्लिन बोल्ड’, मध्यरात्री नाट्यमय घडामोडीनंतर सरकार कोसळले
शाहबाज यांनी राजकारणामध्ये 80 च्या दशकामध्ये एन्ट्री झाली. 1988 मध्ये ते पहिल्यांदा निवडणूक जिंकले. पंजाब प्रांतातील लाहोर विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. 1990 ला विधानसभा भंग झाल्यानंतर झालेली निवडणूकही त्यांनी जिंकली. आमदारकीनंतर खासदारकीही त्यांनी जिंकली आणि त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत संसदीय राजकारणात प्रवेश केला. 1993 मध्ये संसदही भंग झाल्याने त्यांची खासदारकी गेली. 1993 मध्ये त्यांनी पुन्हा लाहोर विधानसभा आणि संसदीय निवडणूक जिंकली. मात्र यावेळी त्यांनी खासदारकीचा त्याग केला.
1997 मध्ये त्यांना पुन्हा एकदा पंजाब प्रातमध्ये निवडणूक जिंकली. मुस्लिम लीग नवाजच्या (PML-N) तिकीटावर ते निवडून आले आणि त्यांनी पहिल्यांदा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र 1999 ला पाकिस्तानी सैन्याने सत्तांतर घडवून आणल्याने त्यांची खुर्ची गेली. त्यामुळसे ते देश सोडून कुटुंबासोहत दुबईला गेले. 2007 मध्ये ते पुन्हा कुटुंबासह मायदेशी आले. जून 2008 मध्ये शाहबाज पुन्हा एकदा पंजाबचे मुख्यमंत्री बनले आणि 2013 ची निवडणूक जिंकत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
पाकिस्तान संसदेत हाय व्होल्टेज ड्रामा; राजीनामा देण्यापूर्वी इम्रान खान यांच्या तीन अटी
2018 मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीवेळी मुस्लिम लीग नवाज (PML-N) पक्षाकडून शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदाचे दावेदार होते. परंतु इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाने विजय मिळवला. त्यामुळे शाहबाज शरीफ यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
सप्टेंबर 2020 मध्ये त्यांना हवाला रॅकेट प्रकरणी अटकही करण्यात आली होती. कोट्यवधी रुपयांची अफरातफरी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. एप्रिल 2021 मध्ये त्यांना लाहोर उच्च न्यायालयाने जामिन दिला. अद्यापही त्यांच्यावर खटला सुरू आहे.
























































