
भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने आज दिले. आष्टी तालुक्यातील मनोज चौधरी यांच्या पत्नी माधुरी यांनी केलेल्या तक्रारीवरून आठ महिन्यांपूर्वी आमदार धस यांच्यासह 38 जणांवर गुन्हा दाखल आहे.
आमदार धस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आपल्या घराची संरक्षक भिंत पाडली आणि भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून पळवले अशी माधुरी चौधरी यांची तक्रार आहे. त्याप्रकरणी पोलिसांनी कलम 143, 147, 148, 149, 427, 336 आणि 379 कलमांन्वये गुन्हा दाखल केला. माधुरी चौधरी यांनी कलमांमध्ये वाढ करावी अशी मागणी करणारी याचिका संभाजीनगर खंडपीठात दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आमदार धस यांना दणका दिला.





























































