पोटातून काढल्या 100 कोकेनच्या कॅप्सूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नैरोबी येथून मुंबईत आलेल्या ड्रग्ज पेडलरच्या पोटातून जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी 100 कोकेनच्या पॅप्सूल बाहेर काढल्या आहेत. बायकलीप ओडुला असे त्याचे नाव आहे. पोटातून ड्रग्ज तस्करीची यंदाच्या वर्षातील ही पहिलीच घटना आहे.

नैरोबी येथून एकजण ड्रग्ज घेऊन मुंबईत येणार असल्याची माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालया (डीआरआय) ला मिळाली. त्या माहितीनंतर चार दिवसांपूर्वी बायकलीपला ‘डीआरआय’च्या अधिकाऱयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. त्याने पोटात ड्रग्ज लपवल्याचे समजताच त्याला मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी बायकलीपला जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश ‘डीआरआय’ला दिले. त्या आदेशानंतर डीआरआयच्या अधिकाऱयाने बायकलीपला जे. जे. रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पोटाचा एक्स-रे काढण्यात आला. पोटात काही तरी संशयास्पद असल्याचे जे. जे. च्या डॉक्टरांच्या निदर्शनास आले. जे. जे.च्या डॉक्टरांनी सर्जरी करून बायकलीपच्या पोटातून 100 कोकेनच्या पॅप्सूल बाहेर काढल्या. ड्रग्ज तस्करीप्रकरणी बायकलीपला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.

n एप्रिल 2021 ‘डीआरआय’ने दोन पेडलरच्या पोटातून 151 कोकेनच्या पॅप्सूल काढल्या.
n ऑगस्ट 2021 ‘डीआरआय’ने एका पेडलरच्या पोटातून 8 कोटी रुपयांच्या कोकेनच्या पॅप्सूल काढल्या.