
मुंबईतील प्रसिद्ध किशनचंद चेलाराम कॉलेज, एचएसएनसी युनिव्हर्सिटी, मुंबई, 11 ते 13 एप्रिल 2022 या कालावधीत 9व्या आंतरराष्ट्रीय मीडिया समिटचे आयोजन करण्यात येत आहे. हे समिट गेल्या आठ वर्षांपासून मास मीडिया विभागाद्वारे आयोजित करण्यात येते. या वर्षीच्या परिषदेचा विषय ‘मीडिया: विषय, तंत्रज्ञान आणि व्यवसाय’ असा आहे. Saamana.com या समिटचे प्रादेशिक डिजिटल मीडिया पार्टनर आहेत.
या परिषदेला जगभरातील नामवंत संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत ब्रिटन, अमेरिका आणि स्वीडनमधील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. हिंदुस्थानातील नामांकित विद्यापीठांनीही या परिषदेसाठी आपला सहभाग निश्चित केला आहे.
उद्घाटन समारंभाच्या प्रमुख अतिथी डॉ. हेमलता बागला, प्राचार्य, केसी कॉलेज, कुलगुरू, एचएनऐसी विद्यापीठ या असतील तर परिषदेचे मुख्य भाषण डॉ. जी.डी. जयलक्ष्मी, एडिनबर्ग नेपियर विद्यापीठ, यूके यांचे होईल. डॉ. संगीता बग्गा-गुप्ता, जोन्कोपिंग युनिव्हर्सिटी, स्वीडन, डॉ. जेनिफरसुवाक, पेनसिल्व्हेनिया, यूएसए, कुत्झटाउन युनिव्हर्सिटी, डॉ. स्यूसडबरी, बोर्न माउथ युनिव्हर्सिटी, यूके आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री. मणिरत्नम यांचीही व्याख्याने या परिषदेत होणार आहेत. या परिषदेत आपल्या संशोधन साहित्याचे वचन करण्यासाठी देशातील विविध 25 विद्यापीठांतून मीडिया अभ्यासक सहभागी होणार आहेत.
मीडिया समिटचा एक भाग म्हणून टॉकिंग फ्रेम्सहा चित्रपट महोत्सव 9 एप्रिल रोजी संपन्न झाला. स्क्रिनिंगसाठीचे चित्रपट के.सी कॉलेजच्या यू जी स्टुडंट्स ऑफ फिल्म, टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन (BAFTNMP) च्या 2022 बॅचच्या विद्यार्थ्यांनी दिग्दर्शित आणि संपादित केले होते. महोत्सवात 14 लघुपट दाखवले गेले. चित्रपट निर्माते मयूर पुरीया महोत्सवाचे प्रमुख अतिथी होते तर शिल्पा सुब्रमणी, वरिष्ठ सहयोगी, संगीत संशोधन आणि आणि निषाद सेन यांनी लघुपटांचे परीक्षण केले.
प्री कॉन्फरन्स सत्र 11 एप्रिल 2022 रोजी आयोजित केले होते, ज्यात माध्यम संशोधनसंबंधी विविध विषयांवरील कार्यशाला आयोजित केल्या होत्या. डॉ सोनम मनसुखानी, उपसंचालक, सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग अँड व्हर्च्युअल लर्निंग आणि माजी सहाय्यक डीन SHSS, जैन विद्यापीठ, बेंगळुरू, डॉ. प्रीती ओझा, सहयोगी प्राध्यापक, सेंट अँड्र्यू कॉलेज, मुंबई संस्थापक, ग्रँड अकादमिक पोर्टल आणि डॉ. गणेसन, अध्यक्ष एन एफ ई डी हे या कार्यशाळांमधील प्रमुख वक्ते आहेत.
डॉ. हेमलता बागला, प्राचार्य, केसी कॉलेज, सीनियर डीन विज्ञान आणि तंत्रज्ञान, एचएनऐसी विद्यापीठ आणि मा. संचालक, केसी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणाल्या, “संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि व्यावसायिकांना विषय, तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील सर्व उत्क्रांती जाणून घेण्यासाठी आणि स्वतःला अपडेट करण्यासाठी कॉन्फरन्स मार्गदर्शन करेल”.
अधिक माहिती देताना, डॉ. मंजुला श्रीनिवास, प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक, मास मीडिया विभाग आणि परिषदेच्या संयोजक म्हणाल्या, “ही परिषद लोकांना नवीन माध्यमांच्या संधी समजून घेण्यास मदत करेल आणि त्यांना समान क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्यास मदत करेल”.
किशनचंद चेलाराम कॉलेज आणि मास मीडिया विभागाविषयी: केसी कॉलेजची स्थापना 1954 मध्ये हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्ड, एच(एस) एनसी बोर्ड यांच्या अंतर्गत करण्यात आली. जानेवारी 2015 मध्ये मुंबई विद्यापीठाने ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, (शहरी क्षेत्र) पुरस्कार’ जिंकला. महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी नवीन शिक्षण पद्धती वापरण्यावर ठाम विश्वास ठेवतो. इंडिया टुडे मासिकाने गेल्या दहा वर्षांत सात वेळा मास मीडिया विभागाला देशातील शीर्ष 10 जनसंवाद विभागांमध्ये सूचीबद्ध केले होते यावरून हे स्पष्ट होते. 2019 मध्ये द वीक मॅगझिनने टॉप 10 मीडिया कॉलेजेसमध्ये देखील विभागाची नोंद केली होती. 2020 मध्ये, इंडिया टुडे मॅगझिनने देशातील टॉप 5 उदयोन्मुख मास कम्युनिकेशन कॉलेजमध्ये मास मीडिया विभागाचा क्रमांक पटकावला होता. माध्यम व्यावसायिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन, विभाग यशस्वीरित्या अंडरग्रेजुएट पदवी अभ्यासक्रम ऑफर करत आहे – मल्टीमीडिया आणि बॅचलर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन (बिएएमएमसी), बॅचलर ऑफ आर्ट्स इन फिल्म, टेलिव्हिजन आणि न्यू मीडिया प्रोडक्शन (बिएऐफटिऐनऐमपी) आणि दोन, दोन वर्षांचे पदव्युत्तर पदवी प्रोग्राम्स मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) आणि मास्टर ऑफ आर्ट्स इन एंटरटेनमेंट, मीडिया आणि जाहिरात (बिएऐफटिऐनऐमपी) (ऐमए-ईऐए).





























































