
आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे तपास अधिकारी वी. वी. सिंग आणि आशीष रंजन यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. दोन्ही अधिकाऱयांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी एनसीबीने कार्डेलिया क्रुझवर कारवाई करून आर्यन खानला अटक केली होती. क्रुझ प्रकरणात वी. वी. सिंग आणि आशीष रंजन हे दोन्ही अधिकारी होते. क्रुझ कारवाईनंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांनंतर एनसीबीने त्यांची बाजू स्पष्ट केली होती.
मलिक यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन एनसीबी मुख्यालयाने वी. वी. सिंग आणि आशीष रंजन यांच्या चौकशीचा निर्णय घेतला. एनसीबी दक्षता पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंग यांनी दोन्ही अधिकाऱयांची विभागीय चौकशी केली होती. चौकशी अहवाल नुकताच सादर केला असून त्यानंतर दोन्ही अधिकाऱयांच्या निलंबनाची कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.




























































