आम्ही असताना मनसेला सोबत घेण्याची गरज काय? रामदास आठवले यांचा भाजपला ‘घरचा आहेर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘भाजपला 2024च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 400 जागा मिळतील,’ असे भाकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ‘आम्ही असताना मनसेला सोबत घेण्याची गरजच काय?’ असा सवाल करीत त्यांनी भाजपला ‘घरचा आहेर’ दिला आहे. दरम्यान, ‘मनसेचे वादळ केवळ भाषणांचे आहे, मतांचे नाही,’ असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथे ‘जयभीम फेस्टिव्हल’च्या उद्घाटनावेळी राज्यमंत्री आठवले पत्रकारांशी बोलत होते. ‘मनसेला सोबत घेणे योग्य वाटत नाही. आम्ही असताना त्यांची गरज काय? असा सवाल करत, मनसेचे सध्या वादळ असले तरी त्यांना फारशी मते मिळतात असे नाही. आता हिंदुत्ववादाचा मुद्दा घेतला असला तरी फारसा फरक पडत नाही,’ असे आठवले म्हणाले.